राज्यातील दारूची दुकानं बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने कठोर निर्बंध लादायला सुरूवात केली आहे. राज्य सरकारने शनिवारी रात्री नवे निर्बंध जाहीर केले.

राज्यात रात्रीच्या संचारबंदीसह दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने अनेक कठोर निर्बंध जाहीर केले आहेत. हे निर्बंध रविवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या नियमावलीत धार्मिक स्थळे आणि दारूच्या दुकानांचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील दारूची दुकानं बंद करण्याचा इशारा दिला आहे.

राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गर्दी झाली तर दारूचे दुकानं देखील बंद होतील, असा थेट इशारा दिला आहे.

गर्दी होत असेल तर दारूची दुकानंही बंद करावी लागतील. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्येही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येईल, असं सूचक वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं आहे.

राज्यातील जनतेने हे निर्बंध सकारात्मकपणे घेऊन पालन करावं. तसंच जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करा, असं आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला केलं आहे.

सरकारने शाळा बंद केल्या मात्र दारूची दुकानं सुरू ठेवली, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपेंनी दारूची दुकानं बंद करण्याबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी सरकारने नवे निर्बंध जारी केले.

गर्दी वाढतच राहिली तर दारूची दुकानं आणि धार्मिक स्थळे देखील बंद करण्यात येतील, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सिंधुताईंच्या ‘त्या’ इच्छेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; घेतला मोठा निर्णय

पालकांनो मुलांची काळजी घ्या! कोरोनाबाधीत मुलांना ‘या’ आजाराचा अधिक धोका

‘ठाकरे सरकार गेंड्यापेक्षा जास्त असंवेदनशील’;चंद्रकांत पाटील संतापले

मुकेश अंबानींनी न्यूयॉर्कमध्ये विकत घेतली नवीन मालमत्ता, किंमत ऐकून व्हाल थक्क

“किरीट सोमय्यांना म्हैस दूध देतेय हे दिसतच नाही, ते नेहमी शेणंच पाहतात”