Top news देश

ऐकावं ते नवलंच! 9 तास झोपा आणि लाखो रुपये कमवा; भारतीय कंपनी देतेय आगळीवेगळी संधी

मुंबई | ऑफिसमध्ये झोप लागल्यानं बॉसचा ओरडा तर अनेकांनी खाल्लाच असेल. एकच काम सातत्यानं करून कंटाळा आल्यानं किंवा पुरेशी झोप न मिळाल्यानं ऑफिसमध्ये कामाच्यावेळी अनेकांना डुलकी लागते. पण आता सतत झोपा काढणाऱ्या लोकांसाठी किंवा झोपायची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठीच भारतातील एक कंपनी सुवर्णसंधी घेऊन येत आहे.

भारतातील एक कंपनी तुम्हाला रात्री 9 तास ऑफिसमध्ये झोपण्यासाठी लाखोंचा पगार देणार आहे. ही आगळीवेगळी कंपनी बेंगळूरू मधील असून ‘वेकफिट’ असं या कंपनीचं नाव आहे. वेकफिट कंपनीनं स्लीप इंटर्नशिप चालू केली आहे. वेकफिट कंपनीनं या अगोदरही स्लीपिंग इंटर्नसाठी वॅकन्सी काढल्या होत्या. यापूर्वीच्या स्लीपिंग इंटर्नशिपसाठी तब्बल 1.7 लाख लोकांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या लाखो लोकांमधून फक्त 23 जणांची निवड करण्यात आली होती. निवड केलेल्या लोकांमध्ये 21 भारतीय नागरिक तर 2 परदेशी नागरिक होते.

वेकफिट कंपनीचे संचालक चैतन्य रामलिंगगौंडा यांनी सांगितले की, लोकांना झोपण्यासाठी एक प्रेरणा मिळावी यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. या इंटर्नशिपसाठी निवडलेल्या लोकांनी दररोज रात्री 9 तास झोप घ्यायची आहे. कंपनी स्लीप इंटर्न्सला झोपण्यासाठी गाद्याही देणार आहे. तसेच 100 दिवस हा उपक्रम चालणार आहे.

स्लीप इंटर्न्सला कंपनी एक लाख रुपयांसह स्लीप एक्सपर्ट, इंटेरिअर डिझायनर, आहारतज्ञ आणि फिटनेसतज्ञ याचं मार्गदर्शनही उपलब्ध करून देणार आहे. इंटर्नशिपसाठी निवडलेल्या लोकांनी 100 दिवस दररोज कंपनीला एक व्हिडीओ बनवून पाठवायचा आहे. ज्यामध्ये इंटर्नशिप करणाऱ्या व्यक्तिला त्याने किती चांगली झोप घेतली हे सांगायचं आहे. तसेच या स्लीप इंटर्न्सला गादीवर झोपण्यापूर्वी किंवा गादीवर झोपण्यानंतरचे पॅटर्न रेकॉर्ड करायचे आहेत.

वेकफिट कंपनीतील या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कंपनीनं काही अटी ठेवल्या आहेत. तुम्हाला बेडवर झोपायला गेल्यानंतर 10 ते 20 मिनिटांत झोप लागली पाहिजे. या इंटर्नशिपसाठी तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल तरी हरकत नाही. तसेच तुम्ही जर शाळा किंवा कॉलेजमध्ये झोपला असाल तर तुम्हाला अतिरिक्त बोनस दिला जाणार आहे.

इंटर्नशिप करणाऱ्या व्यक्तीनं झोपेच्या पद्धतीच शिस्तबद्ध रेकॉर्ड ठेवायचं आहे. तसेच आवाजाच्या ठिकाणी देखील झोपावं लागणार आहे. ज्यांना सोशल मिडीयावर वेळ घालवण्यात इंटरेस्ट नसून झोपण्यात स्वारस्य असेल, तसेच ज्यांनी ‘चामोमाईल’ या औषधी वनस्पतीची चव घेतली असेल त्यांना इंटर्नशिपसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात

एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?

आधी बेड मिळाला नाही, नंतर पार्थिवाची हेळसांड; पुण्याच्या माजी महापौराचा दुर्दैवी शेवट!