Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

ऐकावं ते नवलंच! कुत्र्यांमध्ये भांडण झाल्यानं ‘या’ अभिनेत्यानं पत्नीला दिला घटस्फोट

भोपळ | चित्रपट सृष्टीतील अनेक जोडप्यांमध्ये वा.द झाल्याच्या घटना आपण भरपूरवेळा ऐकल्या असतील. बॉलिवूड मधील कित्येक जोडप्यांनी एकमेकांशी विचार न पटल्यानं, कुटुंबात वाद झाल्यानं किंवा अन्य काही कारणानं घटस्फोट घेतले आहेत. मात्र, बॉलिवूड मधील एका अभिनेत्यानं नवल वाटावं अशा कारणानं पत्नीकडून घटस्फोट घेतल्याची घटना समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंह याने प्राण्यांमध्ये भांडण झाल्यानं आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. अरुणोदय सिंह मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते अजय सिंह यांचे चिरंजीव आहेत. अरुणोदय सिंह यांच कॅनडाची रहिवाशी असणाऱ्या ली एल्टन हीच्याशी नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झालं होतं.

भोपाळच्या विशेष विवाह कायद्यांतर्गत या दोघांनी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच या दोघांमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून वा,द सुरु झाले होते. या वादाची सुरुवात कुत्र्यांच्या भांड,णापासून झाली होती. या दोघांच्या कुत्र्यांमध्ये आपापसात भांडणं झाली होती. कुत्र्यांमध्ये झालेल्या भांडणामुळे या दोघांमध्येही एकदिवस वाद झाला आणि हा वाद आता घटस्फोटापर्यंत येवून पोहचला आहे.

अरुणोदय यांनी 10 मे 2019 रोजी भोपाळच्या फॅमिली कोर्टात ली एल्टन विरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अरुणोदयनं 2019 मध्ये कॅनडामध्ये येणं जाणंही बंद  केलं होतं. 18 डिसेंबर 2019 मध्ये ली एल्टनला काही माहिती न देता भोपाळ कौटुंबिक न्यायालयानं घटस्फोटाचं आदेश दिले आहेत.

ली एल्टननं अरुणोदय विरोधात जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरुणोदय सिंह यानं एकतर्फी घटस्फोट घेतला आहे, असं ली एल्टनचं म्हणनं आहे.  अरुणोदयनं दिलेल्या घटस्फोटाबाबत आपल्याला काहीही माहित नव्हतं. अरुणोदयनं एकतर्फी घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे भोपाळ न्यायालयाचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी ली एल्टननं याचिकेत केली आहे.

दरम्यान, जबलपूर उच्च न्यायालयानं याप्रकरणी भोपाळ कौटुंबिक न्यायालयातून नोंदी मागवल्या आहेत. 6 ऑक्टोबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! रिया आणि सुशांतनं ड्र.ग्ज वेळेत मिळावेत म्हणून ‘ही’ गोष्ट केली होती

झोपडीत राहात होती मुलगी, पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC परीक्षा!

सुशांत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; दिशाच्या शेजाऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा

करण जोहरच्या ‘त्या’ व्हिडीओनं केला धक्कादायक खुलासा! अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनाचं खुलं आवाहन, आदित्य ठाकरेंवरही केले गंभीर आरोप म्हणाली…