ऐकावं ते नवलंच! चीनमध्ये अतिखादाडांना भरावा लागणार 1 लाखाचा दं.ड, नवा कायदा लागू

चीन | चीन मधील लोकांच्या खाण्याची सवयीविषयी तर संपूर्ण जगालाच माहिती आहे. चीन मधील लोकांना अनेक नवनवीन पदार्थ खाण्याची आवड आहे. जर आजच्या युवकांच्या भाषेत बोलायचं झालं तर चीनमध्ये फुडी लोक भरपूर आहेत. मात्र, आता चीनमधील अतिखादाडांना चीनच्या सरकारने चांगलाच झ.टका दिला आहे.

अन्नाचा एकही कण वायला जाऊ नये म्हणून चीनच्या सरकारने चीनमध्ये नवीन कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार अन्न वाया घालवणाऱ्या हॉटेल्स रेस्टॉरंटला तब्बल 1 लाख रुपयांचा दं.ड भरावा लगणार आहे. यासाठी चीनमध्ये ‘ऑपेरेशन एम्पटी प्लेट’ सुरु करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोणाचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण चीनमधील वूहान या शहरात सापडला होता. कोरोना महामा.रीमुळे संपूर्ण जगाबरोबर चीनचे देखील प्रचंड आर्थिक नु.कसान झालं आहे. कोरोनाच्या संक.टानंतर चीनमध्ये आता अन्नधान्याचा तु.टवडा जाणवू लागला आहे.

याच गोष्टीचा विचार करून चीनच्या सरकारने हा नवीन कायदा लागू केला आहे. ऑपरेशन एम्प्टी प्लेटद्वारे जेवण वाया घालवणाऱ्या नागरिकांसह हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर कारवाई केली जाणार आहे.

सध्या ओढवलेल्या अन्नधान्याचं सं.कट दूर करण्यासाठी चीनच्या सरकारने ही आगळी वेगळी योजना आणली आहे. या योजनेची घोषणा करताना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले की, तितकंच खा, जितकी तुम्हाला भूक आहे.

तसेच सध्या देशात अन्नधान्याचा तुटवडा भासत आहे. त्यातच अन्न वाया घालवणाऱ्यांमध्ये चीन जगात सर्वात आघाडीच्या देशामध्ये आहे. त्यामुळे आता अन्न वाया घालवणाऱ्या लोकांवर बं.धनं घालणं गरजेचं आहे, असंही राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

या योजनेद्वारे अन्नधान्य वाया घालवणाऱ्या लोकांवर बं.धनं घालणं आणि त्या अन्नधान्याचा उपयोग देशातील अन्नाचा तु.टवडा भरून काढण्यासाठी करणं, असा या योजनेमागील उद्देश आहे. रात्रीचं नागरिकांनी कमी जेवावं आणि इतर वेळी देखील ताटातील संपूर्ण अन्न खावे, असं देखील चिन मधील लोकांना सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-