कॅनबेरा | आपल्याला माहित आहे की, अनेक पक्षी माणसांप्रमाणे बोलतात. त्यामध्ये पोपटाचा पहिला नंबर येतो. बोलण म्हटलं की सरगळ्यांच्या डोळ्यासमोर मिठू-मिठू करणारा पोपटच आठवतो.
परंतू या आधी तुम्ही कधी एका बदकाला बोलताना पाहिलं आहे का?. नसेल पाहिलं तर आता पाहू शकता. कारण याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदक म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर एक तलाव आणि त्यामध्ये इकडूून-तिकडं पोहणारा बदक डोळ्यासमोर येतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक बदक माणसांप्रमाणे बोलत असल्याचं पाहायला मिळतं आहे. एक बदक एका नदीमध्ये पोहत असून, तो माणसांप्रमाणे काही तरी बडबडत आहे.
आतापर्यंत पाहिलेले बदक हे पॅक-पॅक करत असतात. परंतू व्हिडीओमधील बदक यू बल्डी फूल असं म्हणत आहे. ते एकदाच म्हणून तो थांबला नाही, तर तो बदक सारखंच म्हणत आहे.
हा बदक एक ऑस्ट्रेलियन मस्क डक आहे. हे बदक माणसांच्या आवाजाची नक्कल करू शकतात. या बदकाचं नाव रायपर असल्याचं समजतं आहे. संशोधकांच्या मते रायपरने आपल्या केअर टेकरच्या तोंडून हे वाक्य खूपदा ऐकलं असेल, म्हणून तो ते सारखं बोलत आहे.
बोलक्या बदकाला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, या बदकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
तसेच हा व्हिडीओ एका युट्यूब यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलं असून, त्यातील बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ शेअर देखील केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोब्राची शेपटी धरायला गेला अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
न्यूज वेबसाईट, यूट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरु करा; भाजपच्या सुनील मानेंची मागणी
पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…
…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी
‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात