ऐकावं ते नवलंच! दोन महिन्यांच्या चिमुरड्यासाठी गुजरातच्या पठ्ठ्याने चंद्रावर जमीन घेतली; जाणून घ्या किंमत

सुरत | हौसेला मोल नाही, असं म्हटलं जातं. काही लोक आपली नको ती हौस पूर्ण करण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करत असतात. अशीच आता एका हौशी व्यक्तीनं थेट चंद्रावरंच जमीन घेतल्याची बातमी समोर आली आहे.

सर्वांनाच चंद्र म्हटलं की एक वेगळं आकर्षण वाटतं. चंद्रविषयी वैज्ञानिकांचे सातत्याने समोर येणारे नवनवीन दावे यांच्यामुळे हे कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. चंद्रावर देखील मानवी वसाहत निर्माण करण्याचा काही वैज्ञानिकांचा मानस आहे.

यामुळे काही लोकांनी चंद्रावर जमीन खरेदी करण्यास सुरुवात देखील केली आहे. गुजरात मधील एका हौशी व्यक्तीने देखील चंद्रावर जमीन घेतली आहे. या हौशी व्यक्तीचं नाव विजयभाई कथीरिया असं आहे. विजयभाई सुरत मधील एक व्यापारी आहेत.

विजयभाई यांना दोन महिन्यांच्या एक मुलगा आहे. याच नाव त्यांनी नित्या असं ठेवलं आहे. विजयभाईंनी नित्यासाठीच चंद्रावर जमीन खरेदी करून ठेवली आहे. आपल्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलासाठी विजयभाईंनी केलेल्या गोष्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी विजयभाई यांनी न्यूयॉर्क मधील इंटरनॅशनल लुनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला होता. या मेलला त्यांना 13 मार्च रोजी अॅप्रुव्हल मिळालं. सर्व गरजेच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विजयभाई यांना मुलाच्या नावाच्या कंपनीचं एक प्रमाणपत्र देण्यात आलं. हे प्रमाणपत्र एक अत्यंत मोलाचं गिफ्ट समजलं जातं.

विजयभाई यांना चंद्राच्या दुसऱ्या बाजूला जमीन देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी विजयभाई यांना जमीन देण्यात आली आहे त्याचं नाव मेर मॉस्कोव्हियन्स असं आहे. यालाच सी ऑफ मस्कोव्ही असंही म्हटलं जातं.

विजयभाई यांना जमीन नेमकी किती रुपयाला मिळाली याचा अद्याप खुलासा झाला नाही. पण ही जमीन विजयभाई यांना 750 डॉलरला मिळाल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच भारतीय चलनांनुसार विजयभाई यांना ही जमीन 54 हजार रुपयांमध्ये मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘…म्हणून देशमुखांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले’; संजय राऊतांचा रोखठोक मधून गृहमंत्र्यांवर ह.ल्लाबोल

संतापाचा कडेलोट! ‘या’ भाजप आमदाराचे कपडे फाडत शेतकऱ्यांनी चढवला ह.ल्ला; व्हिडीओ व्हायरल

पतीला घटस्फोट देऊन ‘ही’ अभिनेत्री राहतेय बाॅबी देओलच्या घरात

‘फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत,…

‘या’ अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोवर कमेंट केल्यामुळे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy