मुंबई | मोबाईल म्हणजे जणू आता जिवनावश्यक असणाऱ्या गोष्टींपैकी एक बनू लागला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच मोबाईल हवा असतो. मोबाईल नसेल तर जणू सर्वच कामे ठप्प होऊन जातात. आपल्या हातातील या छोट्याश्या उपकरणाने सर्वांचंच आयुष्य व्यापून टाकलं आहे.
मोबाईलचा अतिवापर करणे अनेकदा चांगलंच अंगलट येतं. भरपूरवेळा या मोबाईलमुळे न भरून येणाऱ्या नुकसानास सामोरं जावं लागतं. काही लोक तर या मोबाईलच्या नादात बाकीची दुनियाच विसरून जातात.
आता असंच काहीसं एका आईनं केलं आहे. मोबाईलवर बोलण्याच्या नादात ही आई चक्क आपल्या पोटच्या मुलालाच भररस्त्यात विसरून गेली आहे. ही आई आपल्या बाळाला रस्त्यावर विसरुन चालत पुढे जाते. सध्या याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला मोबाईलवर बोलण्याच्या नादात आपल्या मुलाला रस्त्यावर विसरली आहे. ती मोबाईलवर बोलत सरळ पुढे चालली आहे. आपला मुलगा आपण पाठीमागेच विसरलोय हे तिच्या लक्षात देखील येत नाही.
तेवढ्यात पाठीमागून एक व्यक्ती खांद्यावर बाळाला घेऊन त्या महिलेच्या दिशेने पळत येत आहे. तो व्यक्ती पाठीमागून महिलेला आवाज देत आहे. तरी देखील या महिलेचं लक्ष त्याच्याकडे जात नाही.
तिचं लक्ष त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर ती आपल्या मुलाला त्या व्यक्तीकडून घेते. यानंतर हा व्यक्ती त्या महिलेला समजावताना दिसत आहे. रस्त्यावर असणारे इतर लोक या महिलेकडे आश्चर्यचकित होऊन पाहताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलं नाही.
दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. लोक यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. younglandlord01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘चुक केली पण…’, शिल्पाच्या पोस्टनं वेधलं अनेकांचं लक्ष
अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!
…म्हणून सई ताम्हणकर मराठी चित्रपटांपासून दुरावली!
पवनदीपच्या खासगी गोष्टीचा अरुणीताकडून खुलासा, म्हणाली…
मी आता केक कापणार नाही तर…; बर्थडेवरून भडकलेल्या गर्लफ्रेंडने उचललं ‘हे’ पाऊल; व्हिडीओ व्हायरल