पुणे | भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) नुकत्याच बारामती दौऱ्यावर येऊन गेल्या. यावेळी त्यांनी बारामती (Baramati) तालुक्यात पक्षाला बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रवादीला दणका देण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील बारामती तालुक्यात गावांना भेटी दिल्या. त्यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधला.
डोर्लेवाडी (Dorlewadi) गावात त्यांची सभा असताना, कार्यक्रमात गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. दोन वेगळ्या गटांनी सुळे यांच्यासमोर गोंधळ घातला. त्यामुळे कार्यक्रम काही काळ थांबला होता.
जेजुरी ते नीरा नरसिंहपूर रस्ता डोर्लेवाडी गावातून जातो. यावेळी सुळे गावकऱ्यांसोबत संवाद साधत होत्या. पण सदर रस्ता रुंदीकरणावरुन वाद झाला. या रस्त्याचे रुंदीकरण 10 मीटर व्हावे, की 7 मीटर व्हावे, यावरुन गावकऱ्यांत वाद झाला.
हा वाद इतका विकोपाला गेला की गावकरी सुप्रिया सुळे यांच्यासमोरच भांडू लागले. नंतर सुळे यांनी मध्यस्थी करत स्वत: गावकऱ्यांची समजूत काढली.
सुळे यांनी यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि बांधकाम विभाग यांच्यासोबत चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरु असून या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित आहे. यावरुन ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. याचे रुपांतर मागील काळात भांडणात झाले आहे.
सुप्रिया सुळे यांनी चर्चेदरम्यान ग्रामस्थांची समजूत काढली आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
राजस्थानात 90 आमदारांनी काँग्रेसला राजीनाम्याची धमकी दिली; केली ‘ही’ मोठी मागणी
रायगडावर शिवाजी महारांच्या समाधीस्थळी पिंडदानाचा प्रकार उघड; व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत
संतोष बांगर यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया; “माझी बहीण आणि पत्नी जर…”
अब्दुल सत्तारांची उद्धव ठाकरेंवर मोठी टीका; म्हणाले, पुढील दहा जन्म तुमची…