भारतातील ‘या’ शहरात 100 वर्षांसाठी लॉकडाऊन लागू?; पाहा नेमका काय आहे प्रकार

मध्यप्रदेश | गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. काही महिन्यापूर्वी कोरोना आटोक्यात आला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना डोकं वर काढायला सुरूवात केली आहे.

त्यामुळे कोरोनाची रूग्णसंख्या वाढ लागली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारने काही निर्बंदही लागू केले. यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे या नियमांचा समावेश होता.

परंतू कोरोनाबांधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे सरकारने ज्या त्या राज्यानूसार कोरोना कसा आटोक्यात आण्याचा यासाठी ज्या त्या राज्याला अधिकार दिले आहे. अशातच देशातील एका शहरात 100 वर्षांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं असल्याची माहिती समोर येतं आहे.

मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढत चालली आहे. त्यामुळे या शहरात 100 वर्ष लॉकडाऊन करण्याचे जाहीर करण्यात आलं असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. हा आदेश जबलपूरच्या तहसीलव्दारा जारी करण्यात आला आहे.

जारी केलेल्या आदेश पत्रामध्ये 3 एप्रिल 2021 ते 19 एप्रिल 2121 पर्यंत लॉकडाऊन असणार असल्याचं म्हटलं आहे. या आदेश पत्रातवर तहशीलदार सुषमा दुर्वे यांची स्वाक्षरी देखील आहे. त्यांचे हे आदेश पत्र सोशल मिडीया सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

जबलपूरमध्ये 100 वर्षाचे लॉकडाऊन लागणार नाहीय. साहाजिक गोष्ट आहे, आदेश पत्रामध्ये टापिंग मिस्टेक झाली असणार. परंतू एवढ्या महत्वपूर्ण आदेशवर असलेल्या टाईपिंग मिस्टेकला नजरअंदाज करता. एक प्रशासकिय अधिकारी त्या आदेशावरून आपली स्वाक्षरी कसा काय करू शकतो?, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच या कृत्याची सोशल मिडीयावर निंदा केली जात आहे.

या आदेश पत्रामध्ये आपण पाहू शकतो की, 3 एप्रिल रात्री 10 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. म्हणजेच शनिवार रात्री 10 वाजल्यापासून ते सोमवारी 6 वाजेपर्यंत 32 तासांचे लॉकडाऊन असणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात शासकीय संस्था, दुकान, हॉटेल बंद राहणार आहेत. तसेच याशिवाय रविवारच्या दिवशीही दारूची दुकानेही बंद राहणार असल्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते’; बॉलिवूडच्या…

नॅशनल क्रश रश्मिका मंदना गुडबायमध्ये बॉलिवूडमधील…

मास्क न घातलेल्या कंगना रणौतला ‘या’ अभिनेत्यानं…

उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर होऊ…

पुन्हा एकदा ऐकू येणार ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हा’…

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy