पुणे | कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये म्हणून लॉकडाऊन असल्याने धार्मिक कार्यक्रम तसंच लग्न समारंभावर बंदी आणण्यात आली होती. मात्र आता पुण्यात विवाह करणाऱ्या इच्छुकांना प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात कंटेनमेंट झोन वगळता कुठेही 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास आता परवानगीची गरज नाही. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळणं ही सगळ्यात महत्त्वाची अट घालण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात 50 लोकांमध्ये परवानगीची गरज नाही. कंटेनमेंट झोन वगळता कुठेही लग्न करता येऊ शकते. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरासह इतर कटेंनमेंट झोन वगळून जिल्हाअंतर्गत लग्नासाठी परवानगीची गरज नाही. सुरक्षित समाजिक अंतर ठेऊन आणि नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे.
कंटेनमेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. तसंच कंटेनमेंट झोनमधून ये-जा देखील करता येणार नाही, अशा सूचना सरकारच्या 3 मे रोजी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या आदेशामधील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही आणि ते अनिवार्य नाही- अलाहाबाद उच्च न्यायालय
-आदित्य ठाकरेंना कुणीतरी प्रोटोकॉल सांगा, बालिश बुद्धी पुन्हा सिद्ध करून दाखवली- निलेश राणे
-LOCKDOWN- 4 : पाहा कसा असेल महाराष्ट्रातलं चौथं लॉकडाऊन…
-गुजरातमध्ये परप्रांतीय कामगारांचा पुन्हा उद्रेक; भरुचमध्ये पोलिसांवर दगडफेक
-कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या जवळपास 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे