Top news देश

लॉकडाऊनमुळे नवऱ्याचा चांगला जॉब गेला; हार न मानता पत्नीनं निवडलं ‘हे’ काम!

नवी दिल्ली | कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले. एकूणच त्याचा परिणाम सर्व कामगारांवर झाला. काही लोकांच्या वेतनात कपात झाली तर काहींच्या नोकरीवर टांगती तलवार होती. पण त्यातच काहींच्या नोकऱ्याही गेल्या.

ज्यांच्या नोकऱ्या कायमच्या गेल्या, त्यांना याचा खूपच मोठा फटका बसला आहे. कारण त्यांचे कमाईचे साधनच बंद झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन वेळच्या अन्नसाठीही त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

अशा काही लाखो लोकांमधील दिल्लीत राहणाऱ्या रोहित सरदाना यांचीही नोकरी गेली. रोहित सरदाना एका कॉस्मेटिक कंपनीत नोकरीला होते. सध्या टाळेबंदीत रोहित सरदाना यांची नोकरी गेली. रोहित हे त्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करत होते.

नोकरी गेल्यानंतर रोहित यांचे कमाईचे साधन अचानक बंद झाले. मग या आलेल्या समस्येवर रोहित यांच्या पत्नीने मार्ग काढला. रोहित यांच्या पत्नी रजनी यांनी बिर्याणी विकण्याचे काम सुरू केले.

आता बिर्याणी विकण्यासाठी एखाद्या छोट्या दुकानाची गरज लागते. पण त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी तेवढेही पैसे नव्हते. कारण दुकानाचे भाडे ३० हजारांच्या आसपास होते, एवढे पैसे त्यांना देणे परवडत नव्हते. मग यावर त्यांनी एक मार्ग काढला.

त्यांच्याजवळ एक चार चाकी गाडी होती. त्या गाडीत बिर्याणी विकायला सुरवात केली. रोहित यांच्या पत्नी रजनी रोज सकाळी ५ वाजता उठायच्या. चार तास मेहनत करून बिर्याणी तयार करायच्या. त्यानंतर सकाळी १० वाजता ते आपला स्टॉल लावत असे.

घरापासून अगदी २०-२५ मिनिटांच्या अंतरावरच त्या स्टॉल लावत होत्या. या कामात त्यांना त्यांचे पती रोहितही मोलाची मदत करत होते. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बिर्याणी विकत होते. हाफ प्लेट बिर्याणी ३० रुपये, फुल प्लेट बिर्याणी ६० रुपये, एक सोया चाप १० रुपये आणि त्याचबरोबर तडका मठ्ठा १० रुपये असे पदार्थ विकत आहे.

आज भलेही हे दाम्पत्य पहिल्या सारखे पैसे कमावत नाही पण आज त्यांची स्थिती चांगली आहे. रजनी यांनी विश्वास आहे की, लवकरच सर्व गोष्टी सुरळित होतील. त्यांच्या या फक्त विश्वासाच्या जोरावर आज हे काम चालू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी बोलताना आता उर्वशीनंही सांगितलं पडद्यामागचं सत्य म्हणाली…

रेखा सध्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते? वाचा काय म्हणाली होती रेखा

चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रंगीन ख्रिस गेल… क्रिकेटसोबतच ‘या’ गोष्टीचाही लुटतोय मनमुराद आनंद!