Uncategorized

रावणाच्या लंकेत बुरखाबंदी झाली, रामाच्या अयोध्येत कधी होणार??? सामनातून मोदींना प्रश्न

लखनऊ : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल यांनी बुरखा आणि नकाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवरुन शिवसेनेच्या मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला आहे. 

– सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय? 

रावणाच्या लंकेत जे घडलं, ते रामाच्या आयोध्येत केव्हा घडणार. भारतात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदी केव्हा आणली जाईल?

-श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी त्याचे हादरे भारताला बसतात. श्रीलंका हा शेजारधर्म आहेच पण भारताचं भावनिक संबंधही आहेत. 

-सरकारी आकडा काहीही सांगत असो पण कोलंबोतील मालिकेत 500 हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला. लिट्टच्या वादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी घेतला. 

भारताचा जम्मू-काश्मिर भाग इस्लामी दहशतवादाने त्रस्त झाला आहे. 

– त्याबाबत नेमके प्रश्न काय आहे? 

श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी कठोर पावले आपण कधी उचलणार? विद्यमान सरकारने ‘ट्रीपल तलाक’विरोधात कायदा करुन पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे हे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचं मैत्रीपाल सिरिसेना यांना सांगितलं.

फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तेथिल सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये हेच प्रकार घडले आहेत, मग याबाबतीत भारत मागे का? असा सवालही सामनामधून केला आहे. 

धर्म आणि समाजव्यवस्था यांची गुंतागुंत इस्लाममध्ये झाल्यामुळे सामान्य मुसलमान भांबावून जातो. धर्माप्रमाणे समाजव्यवस्थेचे नियम अपरिवर्तनीय नसल्यामुळे त्या नियमात कोणी बदल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तो आपल्या धर्मावर घातलेला घाला वाटतो, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटल आहे. 

सामनातील बुरखा आणि नकाब हटवण्याच्या मागणीला भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह साध्वी यांनी पाठिंबा दिला आहे.

देशात बुरखा तसेच नकाब यावर बंदी आणू नये, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. बुरखा घालणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात, बुरखा परिधान करणं ही एक परंपरा आणि त्यांचा अधिकार आहे, असं आठवले म्हणाले आहेत.

भारतात बुरखा बंदी करण्याची गरज नाही, असं म्हणत भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा यांनीही विरोध केला आहे. 

पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आयोध्यात जाणार आहेत. रामजन्मभूमीपासून 28 किलोमीटर अंतरावर त्यांची सभा सुरु आहे. त्यांच्याआधी इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी हे दोघंच आयोध्येत गेले होते.

IMPIMP