‘या’ 4 आमदारांनी ना भाजपला मत दिलं ना महाविकास आघाडीला…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आज मोठा दिवस ठरला. विधानसभेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकारने विश्वादर्शक ठराव जिंकला आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने 169 सदस्यांची मत पडली. त्यामुळे त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. मात्र  4 सदस्य तटस्थ राहिले.

बहुमत चाचणीच्या वेळी मनसे, एमआयएम आणि सीपीआयएम यांचे एकूण चार आमदार तटस्थ राहिले आहेत. त्यामध्ये मनसे आमदार राजू पाटील, एमआयएमचे धुळ्यातील शहा फारूख अन्वर आणि मालेगावचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे दोन तर सीपीएमचे विनोद निकोले असे एकूण चार आमदार तटस्थ राहिले आहेत.

विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडत असताना ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजप आमदारांकडून देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरुवात होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.

राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावलं आहे. हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो, अशा शब्दात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं.

महत्त्वाच्या बातम्या-