अयोध्या राममंदिरातील रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात; संभाजी भिडेंची मागणी

सांगली | राम मंदिराच्या भूमिपूजनााचा मुहूर्त 5 ऑगस्टला ठरला आहे. 5 ऑगस्टला अवघे दोन दिवस बाकी शिल्लक राहिले आहेत. त्याप्रमाणे राम मंदिराच्या भूमिपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंतच्या फोटोंमध्ये राम-लक्ष्मणाला मिशा नव्हत्या. आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम फोटोमध्ये दाखवले गेले. निदान अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या रामाच्या मंदिराच्या मूर्तीमध्ये तर मिशा असाव्यात, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांनी राममंदिर भूमीपूजन सोहळ्याबाबत सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया देत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, देशातील हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती असली तरी कोरोनाला न घाबरता दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे हा सोहळा साजरा करावा. तसेच प्रत्येकाने यानिमिताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावं, असंही भिडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत अमृता फडणवीस यांचं महत्वाचं ट्विट; म्हणाल्या…

चीनकडून युद्धाचे संकेत; सीमेलगत अण्वस्त्रवाहू विमाने, फायटर विमाने तसेच हजारो सैन्य तैनात

संतापजनक! तब्बल 10 शिक्षकांनी केला 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार

आत्महत्येपूर्वी सुशांत सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी; मुंबई पोलिसांचा नवा खुलासा

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं निधन