महाराष्ट्र मुंबई

सत्तेसाठी भुकेल्या शरद पवार यांनी उसनं अवसान आणू नये; भाजपची टीका

मुंबई | पोलिसांना राजकीय पक्षांच्या कार्यक्रमात गुंतवून ठेवू नका तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी किमान बसण्याची तरी व्यवस्था करावी, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

भाजपने व्हीआयपी संस्कृती मोडीत काढली आहे. त्यामुळे सत्तेसाठी भुकेल्या शरद पवार यांनी उसनं अवसान आणू नये, अशी बोचरी टीका माधव भंडारी यांनी शरद पवारांवर केली आहे.

राज्यातील व्हीआयपी संस्कृती मोडीत काढा, नेत्यांचे कार्यक्रम, जाहीर सभांच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांवर ताण येतो, वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यामध्ये गुंतून राहतात त्यामुळे हे थांबलं पाहिजे. पोलिसांवरील ताण कमी झाला पाहिजे, असं पत्र शरद पवारांनी गृहमंत्र्यांना लिहिलं आहे.

दरम्यान, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी सलाम करण्याची पद्धत राज्याचे तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंद करायला लावली, असंही माधव भंडारी यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-शांततेच्या मार्गानं सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही ठरत नाही- हाय कोर्ट

-भाजपकडून सातारचे उदयनराजे भोसले जाणार राज्यसभेवर!

-महाविकास आघाडीचा विद्यार्थ्यांना दिलासा; महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय!

-अमृता फडणवीसांचं नवं इंग्रजी गाणं सोशल मीडियावर ट्रोल!

-शिवसेनेबरोबर आता पुन्हा सूर जुळणं कठीण- चंद्रकांत पाटील