मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचं निधन

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. त्यांचे वडिल माधव पाटणकर यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं आहे.

माधव पाटणकर हे डोंबिवली इथे वास्तव्याला होते. माधव पाटणकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सासऱ्याचंं निधन झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सगळ्या नियोजित बैठका आणि कार्यक्रम रद्द झाले आहेत. आजच त्यांच्यावर डोबिंवलीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कळतीये.

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माधव पाटणकर यांना ट्विटरद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली.”

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“माझ्या वडिलांची काळजी घ्या, मी लवकरच पाटण्याला येईन….”

-सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…

-हात जोडून सांगतो… द्वारकारनाथ संझगिरी यांची कोरोनाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी पोस्ट

-देशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी

-सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… ; पोलिसांचा कडक इशारा