मुंबई | जेष्ठ साहित्यीक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी राज्यात होत असलेल्या राजकारणावर भाष्य केलंय. मधू मंगेश कर्णिक यांनी राज्य सरकारसह विरोधी पक्षातील नेत्यांचाही समाचार घेतला आहे.
सध्या जे राजकारण सुरू आहे ते माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी असं पाहिलं नसल्याचं मधू मंगेश कर्णिक यांनी म्हटलंय. कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय आणि मॅजेस्टिक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या कादंबरीचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
ज्या कालखंडातून ज्या परिवर्तनाच्या अवस्थेतून देश जात आहे महाराष्ट्र जात आहे. अगदी अनेक संकट जी 20 व्या शतकात आम्ही कधी अनुभवली. किंवा कल्पना केली नाही ती संकट या 21 व्या शतकाच्या सुरुवातीलाच यायला लागली. 100 वर्षापूर्वी टिळकांच्या काळत येऊन गेली. त्यानंतर आता कोरोना आला. पण समाजाचे परिवर्तन जे होत आहे वैचारिक, राजकीय आणि विशेषतः राजकारणात जी मानस आहेत. ती ज्या पद्धतीने राजकारण करत आहे. ते मी माझ्या 90 वर्षाच्या आयुष्यात कधी पहिले नसल्याची खंत जेष्ठ साहित्यीक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक व्यक्त केली आहे.
हे असच चालू राहीलं तर एकवेळ कोरोनावर मात करणं शक्य झालं पण राजकारणावर मात करणं शक्य नसून पुढची 80 वर्ष कशी जातील. या देशाच काय होईल हे माहीत नाही आणि हेच विचार या कादंबरीमध्ये मांडलं असल्याचं पद्मश्री कर्णिक यांनी सांगितलं आहे.
कोरोना आला आपण सर्वांनी कोरोना सारख्या भयंकर आजारावर मात केली, मात्र राजकारणावर मात करणं शक्य नसल्याचं मत मधू मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केलं.
सकाळी पैसे खर्च करून पेपर घेतल्यानंतर यांची भांडण आणि याची एकमेकांचे दोषारोप, त्यामुळे वृत्तपत्र सकाळी उघडल्यानंतर वाचावासा वाटत नाही, अशी नाराजी यावेळी मधू मंगेश कर्णिक व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अनिल परबांचं रिसॉर्ट तोडण्यासाठी मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना!
आयपीएलपूर्वी राजस्थान रॉयल्समध्ये वाद, संजू सॅमसन भडकला
“एवढाच जीव जळत असेल तर मला टाका तुरुंगात”
The Kashmir Flies चा मोठा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ कोटींची केली कमाई