‘भाजपमध्ये गेलो असलो तरी…’; ‘या’ भाजप नेत्याने पवारांची बाजू घेत पडळकरांना झापलं

शिर्डी | भाजप पक्षात जरी असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणं योग्य नाही, हे निषेधार्थ आहे, अशा शब्दात भाजप नेते मधुकर पिचड यांनी विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना घरचा आहेर दिला आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, या पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करतना पिचड यांनी त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. तसेच पिचड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून टीकेबद्धल दुःखही व्यक्त केलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणं ही फॅशन झाली आहे. पवारांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वच स्तरातील लोकांसाठी भरीव काम केलं आहे, असं मत पिचड यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पडळकरांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. भाजप नेत्यांनी पडळकरांचं मत वैयक्तिक असल्याचं बोलत याआधीच हात वर केले आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेची अमित शहांवर टीका, म्हणाले…

-‘मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवू’, कराचीतून फोन आल्याचा संशय

-लडाखनंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनने केला दावा

-शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप, म्हणाले….

-राष्ट्रभक्तीचा मक्ता कुणी एका पक्षाने घेतलेला नाही- संजय राऊत