कंगना आणि प्रियंकाने काम केलेल्या ‘फॅशन’ चित्रपटाविषयी निर्मात्याने उलघडलं ‘ते’ गूढ

मुंबई| मधुर भंडारकर हे एक सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. 2008 मध्ये मधुर भंडारकर यांचा आलेला ‘फॅशन’ हा चित्रपट एक यशस्वी चित्रपट आहे. मधुर भंडारकर यांचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत. फॅशन या चित्रपटात कंगना राणावत आणि प्रियंका चोप्राने देखील महत्वाची भूमिका साकारली होती.

फॅशन या चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपट निर्माता मधुर भंडारकर यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. कंगना राणावतनं या चित्रपटात मॉडेल शोनाली गुजरालची भूमिका साकारली होती. तर प्रियांका चोप्राने सुपर मॉडल मेघना माथूरची भूमिका साकारली होती.

आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीलाच दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटातील या अभिनेत्रींच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

कोट्यवधी लोक या गोष्टीची कदर करतात. या चित्रपटामध्ये ग्लॅमर जगाचे सत्य अगदी जवळून दाखवले गेले होते. चित्रपटाच्या कथेची कल्पना कशी सुचली? प्रियंका आणि कंगनासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?, याविषयी मधुर भंडारकर यांनी सांगितले आहे.

त्यांनी चित्रपट सृष्टीतल्या त्यांच्या संघर्षांविषयीही देखील सांगितलं आहे.  मी यापूर्वीच ‘चांदनी बार’ ‘पेज 3’ आणि ‘ट्रॅफिक सिग्नल’ सारखे चित्रपट बनविले होते. मला सुरुवातीपासूनच हे जाणून घ्यायचे होते की रॅम्प वॉक मागे काय चालले आहे. तिथे कोणत्या प्रकारचे लोक येतात. त्यांची कथा काय आहे. मला त्यांच्याबद्दल लोकांना सांगायचे होते, असं मधुर भंडारकर यांनी म्हटलं आहे.

सुदैवाने एकदा मी एका फैशन शोमध्ये गेलो आणि त्यानंतर मी परत स्टेजवर गेलो. फैशन शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना मी भेटलो. बर्‍याच मॉडेल्सशी बोललो आणि या चित्रपटाची कल्पना सुचली, असं मधुर भंडारकर यांनी म्हटलं आहे.

तसेच कंगना राणावत आणि प्रियंका चोप्राने या चित्रपटात उत्तम अभिनय केला आहे. रिअल लाईफमध्ये चित्रपटात दाखवलेल्या गोष्टींपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. मात्र, मला काही मर्यादा असल्यानं ते चित्रपटात दाखवता आलं नाही, असं मधुर भंडारकर यांनी म्हटलं आहे.

तसेच भंडारकर यांनी चित्रपटाशी संबंधित काही छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो शेअर करताना भंडारकर यांनी एक मोठा कॅप्शनही दिला आहे . त्यात त्यांनी चित्रपटाच्या कलाकारांचे तसेच तांत्रिक टीमचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार? संजय राऊतांनी दिला इशारा

आता तर कंगनानं हद्दच पार केली! राष्ट्रपिता महात्मा गांधींवर गंभीर आरोप करत म्हणाली…

काय सांगता! सैफ अली खानला लग्नाआधी करीनाने तब्बल ‘इतक्या’वेळा दिला नकार

अभिनेता आमीर खानला अ.टक होणार का? ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल!

धक्कादायक! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘या’ बालकलाकाराला जीवे मा.रण्याची धमकी