‘त्या एका सीनसाठी 1 कोटी रुपये…’, माधूरी दिक्षीतच्या खुलाशाने बाॅलिवूडकरांची उडाली झोप!

Marathi News | बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम चर्चेत असते. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने  तिने लाखो लोकांच्या मनात घर केले आहे. माधुरीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होणारच याची खात्री तिच्या चाहत्यांना असायची. दरम्यान, माधुरीने एका चित्रपटातील एका खास दृश्यासाठी चक्क एक कोटी रुपये घेतले होते.

काय आहे प्रकरण?

माधुरीने (Madhuri Dixit) 80 आणि 90 च्या दशकात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. आजही माधुरीसाठी तरुणवर्ग तेवढाच वेडा आहे. तिचे चित्रपट लोक आजही मोठ्या आवडीने बघतात. मात्र, माधुरीच्या एका सिनेमातील एका दृश्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटातील एका खास दृश्यासाठी माधुरीने तब्बल एक कोटी रुपये घेतले होते. माधुरीने ‘दयावान’ या चित्रपटात अभिनेता विनोद खन्नासोबत काम केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

हा चित्रपट प्रदर्शित  होताच इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. या चित्रपटात माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यामध्ये काही इंटिमेट सीन्स चित्रीत करण्यात आले होते. याच चित्रपटावेळी माधुरीने एका दृश्यासाठी एक कोटी रुपये घेतले होते. त्या काळात फक्त एका दृश्यासाठी एक कोटी रुपये मोजणे ही मोठी गोष्ट होती. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला तेव्हा विनोद खन्ना आणि माधुरीच्या किसिंग सीनने खळबळ उडवून दिली होती.

बीड पॅर्टन आता पुण्यात सुद्धा, खंडणीसाठी पुण्यातील ‘या’ भागात भरदिवसा गोळीबार

“हा माझ्यासाठी शेवटचा दिवस…”, सलमान खानच्या वक्तव्याने चाहते चिंतेत!

बोल्ड दृश्यामुळे टीका

हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला त्यावेळी या चित्रपटातील असे बोल्ड सीन्स पाहिल्यानंतर सर्वांनी माधुरीवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. या चित्रपटावर टीका इतकी वाढली की, दिग्दर्शक फिरोज खान यांना चित्रपटातून ती दृश्ये काढून टाकण्याची नोटीस पाठवण्यात आली. पण फिरोज खान यांनी कोणाचेही ऐकले नाही आणि चित्रपटातील एकही दृश्य कापले नाही.

या घटनेमुळे माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) मानधनाविषयी आणि त्या काळातील बोल्ड दृश्यांबाबतची मानसिकता याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

News Title : Madhuri Dixit charged 1 crore for a scene