काही शक्तींकडून भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय- माधुरी मिसाळ

पुणे |  गेल्या दोन ते तीन दिवसांपासून टेलिव्हीजनवर आणि वर्तमानपत्रामधून काही बातम्या येत आहेत. भाजपमध्ये फूट पाडून कुणाला राजकीय पोळी भाजायची आहे हे माहिती नाही. पण बाहेर अश्या काही शक्ती कार्यरत आहेत की त्यांना सारखं वाटतं की भाजपचं दुभाजन व्हावं, असा संशय भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी बोलून दाखवला आहे. पंकजा मुंडे यांच्यावर काकडेंनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मिसाळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली.

भाजपमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने काही बातम्या व्हायरल केल्या जात आहेत. गेली 5 वर्ष आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम केलं. त्यांनी आम्हा सर्वांना एकत्र ठेवून पक्ष चालवला आणि यशस्वी सरकार देखील चालवलं, असं मिसाळ म्हणाल्या.

पंकजा ताईंचं पक्षासाठी मोठं काम आहे. काकडेंच्या वक्तव्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, असं म्हणत त्यांनी काकडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तर काही शक्तींकडून भाजपमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना फक्त राजकारणाची पोळी भाजून घ्यायची आहे, असा आरोपही मिसाळ यांनी यावेळी केला.

दरम्यान, पंकजांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्यामुळे त्यांना एवढंही गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका काकडेंनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-