संजय काकडेंनी पंकजा मुंडेंसंदर्भात केलेल्या विधानाशी भाजपचा काहीही संबंध नाही- माधुरी मिसाळ

पुणे | भाजपचे राज्यसभेचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथगडावरून केलेल्या भाषणावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

खासदार संजय काकडे यांचा निषेध करते, त्यांनी पंकजांबद्दल असं बोलायला नको होतं. त्यांचा निषेध करावं इतकंही महत्त्वं त्यांना देण्याची गरज नाही. काकडे आज-उद्या टीव्हीवर-पेपरमध्ये झळकतील त्यासाठीच ते अशी वक्तव्ये करत असतील, अशा शब्दात त्यांनी काकडेंचा समाचार घेतला आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. विशेष म्हणजे काल गोपीनाथगडावरच्या सोहळ्यासाठी माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

पंकजा ताईंचं पक्षासाठी मोठं काम आहे. काकडेंच्या वक्तव्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. काही शक्तींकडून भाजपमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना फक्त राजकारणाची पोळी भाजून घ्यायची आहे, असा आरोपही मिसाळ यांनी यावेळी केला.

दरम्यान, पंकजांना स्वत:चा मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्यामुळे त्यांना एवढंही गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका काकडेंनी केली होती.

महत्वाच्या बातम्या-