मध्य प्रदेश पोलिसांची गुं.डागिरी! रिक्षा चालकाला भर चौकात मारला; व्हिडीओ व्हायरल

इंदौर | वर्षभरापूर्वीपासून कोरोना महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र, पुन्हा एकदा या महामारीनं आपलं डोकं वर काढल्यानं संपूर्ण देशात कडक नियम जाहीर करण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशमध्ये देखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे तेथील प्रशासनाने देखील कडक निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्यांवर मध्य प्रदेश पोलीस कडक कारवाई करत आहे. मात्र, अशातच सध्या एका रिक्षा चालकाचा मास्क खाली सरकल्याने दोन पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांच्या गुं.डागिरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सध्या मध्य प्रदेश पोलिसांवर सर्व स्तरांतून टिका केली जात आहे. तसेच पोलिसांच्या कार्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ही घटना इंदौर शहरातील परदेशीपुरा भागात घडली आहे.

माहितीनुसार, या रिक्षाचालकाचं नाव कृष्णा कुंजीर असं आहे. कृष्णा कुंजीर परदेशीपुरा भागातून आपला मुलगा, बहीण आणि भावजईला घेऊन चालले होते. यावेळी कुंजीर यांचा मास्क त्यांच्या नाकाखाली सरकला होता.

कुंजीर यांचा नाकाखाली घसरलेला मास्क तिथे उभे असणाऱ्या पोलिसांनी पाहिला. पोलिसांनी त्यांना अडवून पोलीस ठाण्यात येण्यासाठी सांगितले. मात्र, कुंजीर यांनी पोलिसांना नकार दिला. यामुळे या दोन पोलिसांनी कुंजीर यांची पँट पाठीमागून खेचली.

यामुळे कुंजीर यांना राग अनावर झाल्याने त्यांनी देखील पोलिसांची कॉलर पकडली. हा वाद इतका वाढत गेला की, या दोन पोलिसांनी कुंजीर यांना भर उन्हात रस्त्यावर मारहाण केली.  कुंजीर यांना मारहाण करत असताना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना माफ करण्याची मागणी पोलीसांना केली. मात्र, पोलिसांनी कोणाचंच ऐकलं नाही.

ही संपूर्ण घटना रस्त्यावरील काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच इंदौरचे एसपी आशुतोष बागरी यांनी कमल प्रजापती आणि धर्मेंद्र जाट नावाच्या या दोन पोलिसांना निलंबित केलं आहे. तसेच पुढील चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. तसेच या पोलिसांवर आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पुढील चार दिवस ‘या’ भागात हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा, वाचा सविस्तर

‘मिसेस श्रीलंका’च्या मंचावर राडा! विजेतीचा मुकूट…

‘वय विचारू नका, थोडी लाज वाटते’ म्हणत…

लग्नात नवरी निघाली नवदेवाची हरवलेली बहीण, पाहा नेमकं काय…

कार्तिक आर्यनने घेतलेल्या ‘लॅम्बोर्गिनी’समोर असं…