“लग्न केवळ शारीरिक सुखासाठी नसते, तर…”; उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण

चेन्नई | विवाह आणि मुलांचे संगोपन यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. लग्न हे केवळ शारीरिक सूख मिळविण्यासाठी केले जात नाही, असे मत मद्रास न्यायालयाने नोंदविले आहे.

लग्नाचा हेतू केवळ शारीरिक सूख मिळवणे हा नसतो. तर त्यातून संतान प्राप्ती देखील केली जाते. संतान उत्पत्ती हा देखील विवाहामागचा प्रधान हेतू असतो, असे मद्रास न्यायालयाने म्हंटले आहे.

विवाहाच्या माध्यमातून कुटुंब विस्तार केला जातो. विवाहानंतर जन्माला आलेली संतती ही पती आणि पत्नीला जोडणारा महत्वाचा दुवा असतो, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी (Krushnan Ramaswami) यांनी एका वकील दांपत्यामध्ये मुलाच्या कस्टडीवरुन सुरु असणाऱ्या वादासंदर्भात न्यायालयीन सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदविले.

पती पत्नी म्हणून तुमचे नाते एकवेळ संपुष्टात येऊ शकते, पण आई-वडील म्हणून तुमचे नाते कधीही संपुष्टात येणार नाही, असे न्यायालयाने म्हंटले आहे. तुम्ही दुसरे लग्न केले, तरी तुम्ही त्या मुलाचे आई-वडील असणार आहात, असे न्यायालय म्हणाले.

तसेच आई-वडीलांचे भांडण आणि त्यांचे मुलांकडे दुर्लक्ष हे मुलांमध्ये द्वेष निर्माण करु शकतात, असे देखील न्यायालय म्हणाले आहे. त्यामुळे हा द्वेष मुलांमध्ये जन्मजात नसूून तो आईवडिलांमुळे येतो, असे देखील न्यायमूर्ती म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

दसरा मेळाव्याबाबत संजय राऊतांच्या महत्वाच्या सूचना; म्हणाले, ”शिवसैनिकांनी शिवाजी पार्क…”

वेदांता फॉक्सकॉन हातातून गेल्यावर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

ममता बॅनर्जींची मोठे वक्तव्य; केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर पंतप्रधान मोदी करत नाहीत, तर भाजप…

“5 सप्टेंबरला अग्रवाल मोदींना भेटले आणि…” रोहीत पवार यांचे वेदांतावर मोठे वक्तव्य

आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त दोन-अडीच…