अजित पवारांनी मिसळला भाजपच्या सुरात सुर म्हणाले, “आदित्य ठाकरे…”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ते विधीमंडळाच्या अधिवेशनात आले नाहीत. त्याचबरोबर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला नाही.

मुख्यमंत्र्यांच्या गैरहाजरीमुळे भाजपने शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे आता आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं, अशी मागणी केली होती.

भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधला होता. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील चुकून भाजपच्या सुरात सुर मिसळल्याचं पहायला मिळालं आहे.

अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पवार यांनी राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि ऑक्सिजनची मागणी वाढली तर निर्बंध कठोर करावे लागतील, असं सांगितलं.

कोरोना आढावावर माहिती देत असताना अजित पवार यांनी बोलताना आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) मुख्यमंत्री म्हटलं. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

ऑक्सिजनची मागणी वाढली तर त्याबद्दलचे निर्णय मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरे साहेब घेतील, असं अजित पवार म्हणाले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे सर्व स्तरांवरून मुख्यमंत्रीपदाचा कारभार दुसऱ्या व्यक्तींकडे सोपविण्याची मागणी होत असतानाच अजित पवार यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“विराट कोहलीचं लज्जास्पद कृत्य, त्याला निलंबित करा”, इंग्लंडचा माजी कर्णधार संतापला

ठरलं तर! योगी अयोध्येतून नाही तर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार

 “…तर शक्यता नाकारता येत नाही”; लाॅकडाऊनबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

 ‘मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरु आहे’; अभिनेता किरण माने प्रकरणावर मलिकांची प्रतिक्रिया

  महत्त्वाची बातमी! कोरोनामुळे बंद असलेल्या ‘या’ गाड्या पुन्हा रेल्वे ट्रॅकवर धावणार