महाराष्ट्र मुंबई

अजित पवारांचा यू-टर्न, अखेर विरोधकांच्या सुरात मिसळला सूर!

मुंबई : ईव्हीएमच्या सहाय्याने निवडणूक घेण्यावर काही दिवसांपूर्वी विश्वास दर्शवणारे अजित पवार यांनीही आता विरोधकांच्या सुरात सूर मिसळत, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे.

ईव्हीएममध्ये तांत्रिक फेरफार केली जाते, अशी नागरिकांच्या मनात शंका आहे. लोकशाही टिकून राहावी आणि लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.

जगातल्या प्रगत देशांमध्ये निवडणुका बॅलेट पेपरवरतीच घेतल्या जातात, असं सांगत त्यांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली आहे. 

काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत राज्यस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे काँग्रेसला यश मिळालं होतं. जर ईव्हीएममध्ये फेरफार झाला असता तर हे बदल घडले नसते, असा प्रश्न त्यांनी गेल्या महिन्यात पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपासून ईव्हीएम फेरफाराबाबत शंका उपस्थित करत निवडणूक मतपत्रीकांच्या सहाय्याने घेतली जावी, अशी मागणी केली होती.

शरद पवारांनी ईव्हीएमवर शंका घेतली तेव्हा अजित पवार यांनी ईव्हीएमबाबत आपल्या मनात शंका नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-“कुलभूषण जाधव यांना सुखरुप आणणे हाच सरकराचा खरा पुरुषार्थ ठरेल”

-तिकीट मिळण्याआधीच रोहित पवारांची ‘विकेट’???

-शिवाजीराव आढळराव पाटलांची मस्ती जिरली- अजित पवार

-‘सैराट’सारखं हत्याकांड!!! एका भावाला फाशी तर दुसऱ्याला जन्मठेप

-वर्ल्डकप जिंकल्यानंतर तिने उतरवले कपडे… नेटकरी म्हणतात ही तर इंग्लंडची पूनम पांडे!

IMPIMP