प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यसस्फोट; म्हणतात…

अमरावती : गेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने वंचित आघाडीला मतदान केले नाही. ‘एमआयएम’सोबत युती तुटली तरी त्याचा वंचित आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा गौप्यस्फोट करत एमआयएम सोबतची युती तुटल्याची कबुली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून तो एमआयएमला सुद्धा आहे, अशा शब्दात एमआयएमला पुढील वाटचालीसाठी आंबेडकरांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मुस्लिम समाजाचा आत्मविश्वास वाढल्याने तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 25 जागा मुस्लिम समाजातील उमेदवारांना देणार, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे मातंग समाजाच्या वतीने सत्तासंपादन व प्रबोधन मेळाव्यात आले असता बाळासाहेबांनी पत्रकारांशी संवाद साधला. वंचित आघाडी सत्तेवर येणार या भीतीने विरोधी पक्षातील नेते भाजपत प्रवेश करत असल्याचा टोलाही आंबेडकरांनी यावेळी लगावला.

भाजप आणि शिवसेनेच जागावाटपावरून काही अडचणी असल्या तरी चर्चेच्या माध्यमातून त्या सोडवण्यात येतील. आठवडाभरात युतीची घोषणा होईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. जागावाटप ही जरा किचकट प्रक्रिया असते. दोनही पक्षांमध्ये अनेक नवे लोक येत आहेत.

आमची ताकद वाढत आहे. त्यामुळे काही जागांबाबतही फेरविचार करावा लागतो. त्यामुळे थोडा वेळ लागत असल्याचेही ते म्हणाले. युती अभेद्य असून आम्ही ऐतिहासिक विजय मिळवू, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-