‘दादागिरी नही चलेगी, नही चलेगी…’; भाजप आमदारांची सभागृहात जोरदार घोषणाबाजी

मुंबई | विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडत असताना ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजप आमदारांकडून देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरुवात होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.

नव्या अधिवेशनाची सुरुवात ‘वंदे मातरम’ ने व्हायला हवं होतं. हे अधिवेशन नियमाला धरुन नाही. 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन स्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावलं आहे. हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो, अशा शब्दात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं.

गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा आहे. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-