“नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी?”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीचं सरकार या परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र विरोधी पक्षात असलेल्या भाजपने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या 3 महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार कोरोनाशी मुकाबला करत असून, या साथीला नियंत्रणात ठेवण्यत आलं आहे. चाचण्यांचा वेग लक्षणीयरित्या वाढला असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढले आहे, अशा आशयाचं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केलं होतं. यावर भाजपने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

भाजपने महाराष्ट्र आणि मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देत 40 टक्के महाराष्ट्र रेड झोनमध्ये असताना नक्की नियंत्रणात काय आहे, कोरोनाची स्थिती की आमदारकी?, असा खोचक सवाल केलाय.

दरम्यान, महाराष्ट्र सरकार कोरोना बाधितांचे आकडे लपवत असल्याचा आरोप विरोधीपक्षाने केला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

-“शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं”

-राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी  एसटी सेवा देणार- विजय वडेट्टिवार

-’17 मेनंतर काय करणार?’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल

-…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध

-धक्कादायक! एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची लागण