Top news महाराष्ट्र मुंबई

दिग्गजांना बाजूला सारत भाजपने विधानपरिषदेसाठी 4 उमेदवार केले जाहीर!

मुंबई |  येत्या 21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपले 4 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पक्षातल्या दिग्गज नेत्यांना नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

नागपुरचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दटके, बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले गोपीचंद पडळकर, माजी उपमुख्यमंत्री आणि लोकसभेवेळी भाजपात प्रवेश केलेले विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजित सिंह मोहिते पाटील आणि डॉ. अजित घोपछडे यांच्या यांना विधानपरिषद उमेदवारीची लॉटरी लागली आहे.

भाजपच्या दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांची पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विधानसभा निवडणुकीत बंधूंकडून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे आणि विधानसभेचे तिकीट नाकारलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी नाकारली आहे.

चारच दिवसांपूर्वी खडसे यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. तर पंकजा मुंडे यांनी कागदपत्रांपासून उमेदवारीसाठी लागणारी सगळी तयारी सुरू केली होती. दुसरीकडे बावनकुळेंनी थेट उमेदवारीविषयी बोलण्याचं टाळलं होतं. मात्र त्यांनाही उमेदवारी मिळेल, अशी आशा होती.

भाजपने आपल्या ट्विटरवरून विधानपरिषद उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजित सिंह मोहिते पाटील, डॉ. अजित घोपछडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी भाजपने जाहीर केली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-सध्याच्या मुख्यमंत्र्यानी आयुष्य घरात बसून काढलंय, म्हणून त्यांना काही फरक पडत नाही- निलेश राणे

-जितेंद्र आव्हाडांनी केली कोरोनावर मात

-आज आहे नारद जयंती; जाणून घ्या नारदाच्या जन्माची कथा आणि पूजेचं महत्त्व

-औरंगाबादच्या घटनेनं माझं मन सुन्न झालंय, रोहित पवार यांचं भावूक ट्विट

-औरंगाबादजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; मालगाडीने 16 मजुरांना जागीच चिरडलं