महाराष्ट्र मुंबई

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच बाळासाहेब थोरातांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | मरगळलेल्या काँग्रेसला पूर्वस्थितीत आणण्यासाठी आखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रात खांदेपालट केला आहे. शनिवारी रात्री महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर बाळासाहेब थोरात चांगलेच अ‌ॅक्टीव झाले आहेत. विधानसभेच्या तोंडावर त्यांनी महाआघाडीचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे, वंचित आणि इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवेसेना युतीच्या निमित्ताने लोकशाहीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं थोरात म्हणाले आहेत

समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्हाला ज्यांच्याशी चर्चा करण्याची गरज पडेल त्यांच्याशी चर्चा करु, असंही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 3 महिन्यांवर येऊन ठेपलीये. सुस्तावलेल्या काँग्रेसला पूर्वपदावर आणण्याची मोठी जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर असणार आहे.

दरम्यान, देशभरात मोठ्या प्रमाणावर काँग्रेसची वाताहात झाली आहे. कर्नाटक आणि गोवा त्याचं मूर्तीमंत उदाहरण आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या हातातून सत्ता खेचण्याचं मोठं आव्हान थोरात यांच्यापुढे आहे.

IMPIMP