मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचं प्रमाण जरी सर्वाधिक असलं तरी इतर राज्यांच्या तुलनेत मृत्यूदर हा कमी आहे. पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदर हा कमी आहे.
पश्चिम बंगालचा मृत्यूदर हा 8.40, गुजरातचा 5.99 आणि मध्य प्रदेश 4.51 एवढा आहे तर या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा मृत्यूदर 3.49 इतका आहे. जागतिक मृत्यूदराचं प्रमाण 6.61 इतकं आहे.
महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात आतापर्यंतची सर्वांत उच्चांकी वाढ झाली. काल दिवसभरात राज्यात 2940 नव्या रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्याचा एकूण आकडा 44582 झाला आहे. गेल्या 5 दिवसांत जवळपास 11 हजार नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संसर्गाचं वाढणारं प्रमाण चिंतीत करणारं आहे.
काल एकाच दिवसात 857 लोक बरी झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 12 हजार 883 इतकी झाली आहे. एकंदरित झपाट्याने वाढ होत असली तरी रूग्णाचं बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आजारी वडिलांना घेऊन 7 दिवसांत 1200 किमी सायकल प्रवास; ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक
-धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा
-‘भाजपच्या रणांगणातून’ ही प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती गायब, राज्यभर चर्चांना उधाण
-संकटात सापडलेल्या राज्याला सावरायचं सोडून आंदोलन करून दुहीची बिजं पेरली; आव्हाडांची टीका
-बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत