राज्यातला कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार… मात्र दिलासादायक बाब म्हणजे 3800 बरे होऊन घरी!

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 हजार 228 झाली आहे. आज 1165 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 330 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3800 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 27 हजार 804 नमुन्यांपैकी 2 लाख 06 हजार 481 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर20० हजार 228 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 41 हजार 290 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 976 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 48 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 779 झाली आहे. मालेगाव शहरातील 8 मृत्यू हे 25 एप्रिल ते 8 मे 2020 या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 27, पुण्यातील 9, मालेगाव शहरात 8, पुणे जिल्ह्यात 1, अकोला शहरात 1, नांदेड शहरात 1 तर अमरावती शहरात 1 मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 21 पुरुष तर 27 महिला आहेत. आज झालेल्या 48 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 27 रुग्ण आहेत तर 18 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 जण 40 वर्षांखालील आहे. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत 9 जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित 39 रुग्णांपैकी 28 जणांमध्ये (72 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“पालघर हत्याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडून काढून सीबीआयकडे द्यावी”

-अमित शहांच्या तब्येतीविषयी अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक

-मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड

-दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी

-…म्हणून साई पल्लवीने धुडकावलं 2 कोटी रुपयांचं मानधन