Top news महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज 1196 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा म्हणून सरकार आणि प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. परंतू कोरोनाबाधितांचा आकडा काही कमी होण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये. आतापर्यंतचा राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांच्या आकड्याची आज नोंद झाली आहे.

राज्यात आज 3041 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 50 हजार 231 वर पोहचला आहे. राज्यात आता एकूण 33988 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यातील 1196 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. विविध रूग्णायलांमध्ये हे रूग्ण उपचार घेत होते. आतापर्यंत एकूण 14600 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.  दरम्यान, हॉटस्पॉट क्षेत्रातील चाचण्याचं प्रमाण देखील शासन आणि प्रशासनाने वाढवलं आहे. त्यामुळे आता कोरोनाची लढाई निकाराने लढण्यास प्रशासन सज्ज झालं आहे.

दुसरीकडे लॉकडाऊन एकदम लागू करणे जसे योग्य नव्हते तसेच लॉकडाऊन एकदम उठवणेही योग्य नसल्याने, हळूहळू आपली आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणताना जपून पावले टाकत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आजच्या संबोधनात म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मुंबई विमानतळावरून दररोज 25 विमाने करणार उड्डाण; ठाकरे सरकारचा निर्णय!

-मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा, सोबतच केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

-‘सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षाही भयंकर’; गुजरात सरकारला उच्च न्यायालयाने सुनावलं

-चिंताजनक! राज्यात चोवीस तासात 87 पोलिसांना कोरोनाची लागण

-31 मेनंतर लॉकडाऊन संपणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…