टेंशन वाढलं! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणाऱ्या वाढिमुळे सर्वांचच टेंशन वाढलं आहे.

राज्यात आज नव्याने 1885 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर रायगडमधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाची दहशत पुन्हा एकदा पाहायला मिळत असून सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णांची नोंद ही राज्याची राजधानी मुंबई येथे झाली आहे. आज मुंबईत सर्वाधिक असे 1118 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

एकूण मुंबई परिसरात 1703 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर ठाण्यात 167 कोरोना रूग्ण आढळले आहेत. पुण्यात 74, पिंपरी चिंचवड येथे 22 व नाशिक शहरात नव्याने 14 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.

राज्यात सध्या 17480 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यात कोरोनाने सर्वांचं टेंशन वाढवलं असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सध्या घाबरण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

रूग्णसंख्या वाढत असली तरी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तर वडेट्टीवार यांनी मास्कसक्तीवरही भाष्य केलं आहे.

दरम्यान, चिंतेचं कारण नाही. मात्र, मास्कसक्ती करण्यापेक्षा जनतेनं काळजी घेण्याची गरज आहे, असं मत देखील विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद, वाचा सविस्तर

“घर मे बैठा नकली, अयोध्या जा रहा है असली”

“राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या, आगे आगे देखो होता है क्या”

डॉ. प्रकाश आमटेंची कॅन्सरशी झुंज; तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर