पूरग्रस्तांना दिलासा; सरकारकडून ‘या’ महत्वाच्या घोषणा

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पूरग्रस्त भागातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पिकासाठीचे कर्ज माफ करण्यात येणार असून, कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना शासकीय नुकसानभरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येणार आहे. घराची पडझड झालेल्यांना घरेही बांधून देण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची मदत घेतली जाईल. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीसोबत राज्य शासनातर्फे एक लाख रुपये दिले जातील. बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात २४ हजार आणि शहरी भागात ३६ हजार रुपयेही देण्यात येणार आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देताना एकाच घरात दोन कुटुंबं स्वतंत्र राहात असल्यास त्यांना प्रत्येकाला स्वतंत्र मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 हजार आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

जुलै ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली होती. समितीची बैठक सोमवारी ‘वर्षा’ बंगल्यावर झाली.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या-

-पवारसाहेब, सोडून द्या! कावळेच ते!; ‘सामना’तून शरद पवारांवर टीका

-गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहिजे; धनंजय मुंडेंची एकेरी शब्दात टीका

-सहाय्यक पोलीस निरीक्षकाची पोलीस मुख्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

-रवी शास्त्रींच्या निवडीवर कपिल देव म्हणतात…

-…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे