लॉकडाउनमध्ये थोडा दिलासा; ‘या’ ठिकाणी बससेवा होणार सुरू

मुंबई | कोरोनाला हरवण्यासाठी तिसरा लॉकडाउन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी राज्य सरकारनं जारी केली आहे.

अनेक ठिकाणी आता कुरिअर सेवा सुरू होईल, पोस्ट सुरू होतील, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सुरू होतील तसेच काही ठिकाणी खासगी व सरकारी कार्यालयेही सुरू होतील. विशेष म्हणजे, काही ठिकाणी आंतरजिल्हा बसेसही सुरू होणार आहेत.

ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमध्ये असलेली खासगी आणि सरकारी कार्यालये सुरू होतील. मात्र, रेड झोनमध्ये असलेली ही कार्यालये केवळ 33 टक्के सुरू करावी लागतील. मात्र प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अशा कार्यालयांना कोणतीही मुभा नाही. तेथील कोणतीही कार्यालये सुरू होणार नसल्याचं कळतंय.

विमान, ट्रेन, मेट्रो किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम असेल. शिवाय कोणत्याही शैक्षणिक संस्था सुरू नसतील. याशिवाय कोणतेही हॉटेल्स सुरू ठेवता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

जिल्ह्यात काय सुरू होणार याची संपूर्ण यादी एकदा वाचा…

List

 

महत्वाच्या बातम्या-

-डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाची तहसीलदाराला मारहाण, हे आहे खरं कारण…

-पुणे शहर आणि जिल्ह्यात दारुची दुकाने सुरु होणार का?; आला महत्त्वाचा निर्णय

-जागा चार, नावं सात… ‘या’ नावांपैकी भाजप नेमकी कुणाला देणार संधी?

-काय सांगता??? फेसबुकवर आता चक्क पैसे कमवण्याची संधी

-ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा