राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आता घरपोच दारु मिळणार, पण…

मुंबई | राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मद्यप्रेमींना आता घरबसल्या दारु खरेदी करता येणार आहे. कारण राज्य सरकारने आता ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे. मात्र, ही परवानगी फक्त दारु विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांनाच देण्यात आली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.

लॉकडाऊनदरम्यान राज्य सरकारने दारु विक्रीस परवानगी दिली. मात्र, मद्यविक्री दुकांनांबाहेर प्रचंड गर्दी उसळली. त्यामुळे अखेर राज्य सरकारने दारुच्या होम डिलिव्हरीला परवानगी दिली आहे. पण राज्य सरकारने यासाठी काही शर्ती ठेवल्या आहेत.

याआधी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली.

दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी मद्यप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

महत्वाच्या बातम्या-

-‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र

-भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी

-कौतुकास्पद! कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार

-लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड

-कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय