‘फडणवीसांची आकडेवारी आभासी’; फडणवीसांच्या दाव्याची ठाकरे सरकारकडून पोलखोल

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीनंतर, त्याला महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलं. फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीची चिरफाड आणि पोलखोल सोप्या शब्दात करु असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यासाठीच महाविकास आघाडीकडून आज पत्रकार परिषद आयोजित केली. अनिल परब यांनी फडणवीसांनी सादर केलेल्या प्रत्येक आकडेवारीवर स्पष्टीकरण दिलं.

फडणवीस यांनी सांगितलं की, राज्यातून श्रमिकांसाठी 600 रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यासाठी केंद्र सरकारनं खर्च उचलला. एका रेल्वेसाठी केंद्रानं 50 लाखांचा खर्च उचलला, असं फडणवीस यांनी सांगितलं. आता एका रेल्वेला 50 लाख खर्च कसा येतो? हे फडणवीस यांनी सांगावं, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

प्रत्यक्षात या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारनं दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाही. श्रमिकांना घरी सोडण्यासाठी संपूर्ण खर्च राज्य सरकारनं केला, असं अनिल परब यांनी सांगितलं.

महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं 178 रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. 30 मे पर्यंत या गाड्या सोडायच्या होत्या. पण रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एका दिवसात 148 रेल्वेगाड्या दिल्या. त्यानंतर काल एकाच दिवसात 48 रेल्वेगाड्या सोडल्या. परवापर्यंत सगळं बरं होतं. पण, त्यानंतर मागील दोन दिवसांपासून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं अनिल परब यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-नारायण राणेंच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा; राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी

-सायन रुग्णालयातील एक महिन्याच्या बाळाची कोरोनावर मात; डॉक्टरांकडून टाळ्या वाजवून कौतुक

-सांगली जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफी योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-कसाबला फासापर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचं निधन

-‘त्या’ वक्तव्यानंतर राहुल गांधींंचा उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…