महाराष्ट्र मुंबई

जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूप कमी रुग्ण महाराष्ट्रात आहेत- उद्धव ठाकरे

मुंबई | सव्वा ते दीड लाख रुग्ण मे महिन्याच्या अखेरीस असतील असा अंदाज केंद्राच्या पथकाने नोंदवला होतो. दरम्यान 47 हजार 190 ही करोना रुग्ण संख्या असली तरीही 33 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. उर्वरित 13 हजारांच्या आसपास रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं जो अंदाज वर्तवण्यात आला त्यापेक्षा खूपच रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पिढ्यांमध्ये न पाहिलेली ही परिस्थिती आहे. मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की कोरोनाचं संकट नष्ट होवो अशी दुवा मागा. लॉकडाउन केला आणि आपण त्यातून काय साधलं याची कल्पना देतो. काहींना अजूनही याचं गांभीर्य कळत नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुढचे काही महिने मास्क लावावा लागणारच आहे. तसेच सॅनिटायझर सातत्याने वापरणं, एक विशिष्ट अंतर राखूनच काम करणं, सॅनिटायझर सातत्याने वापरणं. काही महिने हे आपल्याला करावं लागणारच आहे, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘आमच्या वॉर्डात का काम करतोस?’; ‘या’ भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच मारहाण

-“…तर मग सगळ्यात अपयशी गुजरात आणि उ.प्रदेश राज्य, अन् त्यांची जबाबदारी मोदी आणि शहांची असेल”

-खासगी रूग्णालयांना आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कळकळीची विनंती

-“हे जर असंच सुरू राहिलं तर कामगार कपातीप्रमाणे मंत्रीकपात करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येईल”

-PMPML च्या 2100 कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचा पगार नाही