मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील अनेक क्षेत्रांमध्ये लावण्यात आलेले निर्बंध काढण्याबरोबरच सरकार लसीकरणावर भर देत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा प्रादूर्भाव कमी झालेला दिसतोय. तर आकडेवारीत देखील घट पहायला मिळतीये.
राज्यात आज देखील मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढली आहे. आज तब्बल 6 हजार 436 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18 हजार 423 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जानेवारीच्या सुरूवातीपासूनच राज्यातील रूग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याचं पहायला मिळालं होतं. आता नवी रुग्णसंख्या 10 हजाराच्या खाली गेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारची टेन्शन कमी झालंय.
गेल्या 2 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही काही पटींनी कमी झाल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 356 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थितीवर सरकारकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नांना यश आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?; ठाण्यातील पोस्टरची राज्यभर चर्चा
“तुम्ही मोठं पाप केलंय”; संसदेत नरेंद्र मोदींचे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
संसदेत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले “टुकडे टुकडे गँगची लीडर…”
भाजप खासदाराला आला मुलीचा ‘न्यूड व्हिडीओ काॅल’ अन्…
निळी साडी अन् लाल ब्लाऊज… राजेश्वरी खरातचा ‘हा’ हॅाट डान्स तुफान व्हायरल!