“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने भाजप शिवसेना आणि ठाकरे परिवारावर चिखलफेक करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता संजय राऊतांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली.

मुंबईतल्या शिवसेना भवन इथं झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार, खासदारांना बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे याची संपुर्ण देशात याच पत्रकार परिषदेची चर्चा होती. अशातच संजय राऊतांनी गौप्यस्फोट केले आहेत.

महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. केंद्रीय तपास हल्ले करत आहेत, हे देशावरचे संकंट असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात 170 चं बहुमत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. भाजपच्या नेत्यांनी मला म्हटलं आहे की तुम्ही सरकारमधून बाहेर पडा आणि आम्हाला मदत करा, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला आहे.

तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. भाजपकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील राऊतांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या या आरोपानंतर आता भाजप यावर काय उत्तर देणार याकडे आता संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘शेती इकायची नसती वो, राखायची असती’; प्रविण तरडेंनी शेअर केला वडिलांसोबतचा व्हिडीओ

निवडणुकीआधी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; तब्बल 46 वर्षांनंतर ‘हात’ सोडला

मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी

 ‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख

‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा