“आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू “

मुंबई |  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज रात्री 12 वाजल्यापासून महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. तूर्तास 31 मार्चपर्यंत हा निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आाहे. त्यामुळे आजपासून 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. रेल्वे आणि लोकल बंद केल्यानंतर ठाकरे सरकारने एसटी सेवा देखील बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. (Cm Uddhav thackeray Announcement Lockdown Maharashtra)

होम कॉरंटाईनचा शिक्का हातावर असेलेले प्रवासी रेल्वेमधून प्रवास करत असल्याचं निदर्शन आलं होतं. यामुळे कोरोना व्हायरसचा अधिक संसर्ग होऊ शकतो, ही शक्यता होती. त्याच पार्श्वभूमीवर आज रात्री 12 पासून देशात रेल्वेसेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. (Cm Uddav thackeray Announcement Lockdown Maharashtra)

तसंच मुंबईची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल जी कधीही बंद पडत नाही असं म्हणतात ती देखील बंद करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. 31 मार्चपर्यंत लोकलसेवा बंद राहणार आहे. कोणत्याही गोष्टींसाठी अगदी अत्यावश्य लोकांसाठी किंवा सेवेसाठी देखील लोकल चालू राहणार नाही, असं रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. (Cm Uddhav thackeray Announcement Lockdown Maharashtra)

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Cm Uddhav thackeray Announcement Lockdown Maharashtra) नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि वैयक्तिक स्वच्छता राखावी, असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-कोरनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय देशातली रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद

-मोठी बातमी… मुंबईतली लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत बंद

-आपल्या पाळीव प्राण्यांचा त्याग करु नका, हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचं आवाहन

-गाडगेबाबांनी सांगितलेला माणुसकीचा धर्म हाच खरा धर्म; संजय राऊत यांचा प्रबोधनात्मक अग्रलेख

-औरंगाबादकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कारण ‘त्या’ महिलेनं केली सात दिवसात कोरोनावर मात