महाराष्ट्र मुंबई

तुम्ही कोणत्या झोनमध्ये? महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

मुंबई | राज्य सरकारने आज चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार राज्यात केवळ दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. तर केवळ रेड आणि नॉन रेड झोनच ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही झोनमध्ये कन्टेन्मेंट झोन असणार आहे.

मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत. तर राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये येणार आहे. कंटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर देण्यात आली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यावर निर्णय घ्यायचा आहे.

रेड झोनमध्ये रिक्षा, टॅक्सीला परवानगी नाही. चारचाकींना परवानगी आहे. तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी आहे.  मालवाहतूक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

नॉन रेड झोनमध्ये नागरिकांना 22 मेपासून प्रशासनाची कोणतीही परवानगी घ्यावी लागणार नाही. वैयक्तीक वापरासाठी स्पोर्टस कॉम्प्लेक्स, सार्वजनिक ठिकाणे खुली होणार आहेत. मात्र, सांघिक वापर करता येणार नाही. हे सर्व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरु ठेवता येणार आहे. नॉन रेड झोनमध्ये दुचाकी चालकच प्रवास करू शकणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सरासरी गुण देऊन पदवीच्या अंतिम वर्षाचा निकाल लावा”

-चीनपासून वेगळं असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…; डोनाल्ड ट्रम्प यांचा WHOला इशारा

-शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं- देवेंद्र फडणवीस

-इतर राज्यांप्रमाणे शेतकरी, बारा बलुतेदारांना पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

-…म्हणून हा परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो हातात घेऊन यूपीला रवाना झाला!