“…तर राज्यात Lockdown करावं लागणार”

पुणे | राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. पहिला रुग्ण (Patient) आढळल्यामुळे यंत्रण सतर्क झाली आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येईल का ? असे प्रश्न विचारले जात आहे.

काय खबरदारी घेतली जावी, असे विचारण्यात येत आहेत. अशात आयएमएचे (IMA) माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे (Avinash Bhondve) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

येत्या दोन आठवड्यात ओमिक्रॉनचा विषाणूमुळे नेमका किती धोका आहे. याची माहिती मिळेल. तोपर्यंत आपल्याकडची गर्दी आटोक्यात आहे. असं वाटलं ठीक नाही तर कदाचित लॉकडाऊन (Lockdown) करावं लागेल, असं अविनाश भोंडवे यांनी म्हटलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या माहितीनुसार तिथे शंभराहून अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये दोन ते पाच ,किंवा पाच वर्षांखालील मुलांची रुग्ण संख्या अधिक आहे, अशी माहिती अविनाश भोंडवेंनी दिली आहे.

60 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर सर्वाधिक त्रास हा लहान मुलांना होत आहे. यामुळे ओमिक्रॉनची बाधा लहान मुलांना अधिक आहे. यातही ज्या मुलांना ओमिक्रॉनसंसर्ग जास्त झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ज्या मुलांच्या पालकांनी लस घेतली नाही. त्या लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ओमिक्रॉनबाबत महाराष्ट्रात काळजी घेता असताना 2 ते18 वर्षे वयोगटातील मुलाचे लसीकरण करणं आवश्यक आहे. तसेच जी मुले शाळेत जाणार आहेत त्यांच्या आईवडिलांनीही कटाक्षाने लसीकरण करून घेणं आवश्यक असल्याचं भोंडवेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाश्यांचे आरटीपीसार टेस्ट करूनच प्रवास करावा. तसेच इथे आल्यानंतरही विमानातळावर त्याची आरटीपीसार (RTPCR) टेस्ट करून , त्यांना 14 दिवसांचे बंधनकारक क्वारंटाईन करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून या कालावधीतच ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे की नाही . हे लक्षात येईल, असं अविनाश भोंडवेंनी म्हटलं आहे.

ओमिक्रॉनचा पसार खूप वेगाने होत आहे. डेल्टापेक्षा पाचपट वेगाने तो पसरत असल्याचे संशोधक सांगत आहेत. आता त्याची लक्षणे सौम्य आहेत. मृत्यू झालेला नाही. परंतु जेव्हा 60 च्यापुढच्या वयोवृद्ध नागरिकांना जेव्हा याची लागण होईल तेव्हा मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

 “काँग्रेस सत्तेला लाथ मारून महाराष्ट्राला स्वाभिमान दाखवेल…”

Omicron पासून बचावासाठी WHO ने जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना! 

दक्षिण आफ्रिकेत सर्वात वाईट परिस्थिती; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर 

“मग एसटी कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का?” 

कुठेही प्रवास केला नाही तरी झाला Omicron; धक्कादायक बातमीनं देशाचं टेन्शन वाढलं!