मुंबई | राज्याच्या मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आता महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.
काँग्रेस आमदार नाराज असल्याचं पहायला मिळाल्यानंतर आता शिवसेना राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याच्या कामकाजावर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात चर्चा देखील झाली.
अशातच आता भाजप देखील या सर्व प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकार तयार होत असताना मी उद्धवजींना आधीच सांगितलं होतं, गृहमंत्रिपद तुमच्याकडे ठेवा, नाहीतर राष्ट्रवादी असा पक्ष आहे, जे तुमच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर कॅमेरे लावतील, असं चंद्रकांत पाटील शिवसेनेला म्हणाले आहेत.
मी केलेल्या वक्तव्याची त्यावेळी त्यांनी चेष्टा केली गेली. पण आजची परिस्थिती पाहिल्यानंतर माझं त्यावेळचं वक्तव्य शिवसेना आणि उद्धवजींच्या लक्षात येईन, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी हा पक्ष स्वार्थापायी कोणालाही बरोबर घ्यायला तयार असतो किंबहुना तो जायला तयार असतो तुम्ही त्यांचा इतिहास काढून बघा, असा घणाघात देखील चंद्रकांत पाटलांनी यावेळी राष्ट्रवादीवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर
“मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच”
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी
“शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाच्या अदलाबदलीची शक्यता”
Sharad Pawar: शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…