मुंबई | संपूर्ण राज्याचं लक्ष आज नगरपालिकेच्या (Nagar Panchayat Election) निकालावर लागलं आहे. राज्यातील 1,802 नगरपालिकेच्या निकालावर आता चुरसेची लढाई होताना दिसत आहे.
नगरपालिकेच्या या निकालावर आता भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसकडून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने आपणच राज्यातील पहिला पक्ष राहिला असल्याचं सांगितलं आहे.
अशातच आता भाजप महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
अजूनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
नगरपंचायती पूर्ण जिंकणं आणि भाजपच्या पाठिंब्यानं जिंकणं यात देखील भाजप क्रमांक 1 वर हे सिद्ध झालं आहे, असंही ते म्हणाले आहेत.
विचाराने आणि आचाराने एक नसताना देखील युती करून भाजपशी लढत देण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्या एकत्र लढण्याला देखील नजीकच्या काळात आम्ही पुरून उरू, असं थेट इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
नेहमीप्रमाणे शिवसेनेला मात खावी लागत आहे. शिवसेना नेहमीप्रमाणे 4 नंबरचा पक्ष राहिली असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणहून आलेल्या आतापर्यंतच्या निकालात अनेक दिग्गजांनी आपला गड राखला आहे. तर अनेकांना आपल्याच मतदारसंघात मात खावी लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आज आबांची खूप आठवण येतेय’; रोहित पाटील भावूक
रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी
नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने…
ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!
रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता