“मी मोदींना मारूही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो”

भंडारा | आगामी महापालिकेच्या निवडणुकीमुळे आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील दिग्गज नेते आता राज्यभर दौरा करताना दिसत आहेत.

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भंडाऱ्यात सभा घेतली.

भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकांना मारण्यासाठी आणली गेली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे, असं नाना पटोले म्हणाले.

गरीब कुटुंबांना दारिद्रय रेषेच्या वर आणण्यासाठी गॅस सिलिंडर दिलं अन् आता पुढील काळात ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे तो सधन घोषित होईल, असा डाव करण्याचा केंद्र सरकारचा असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

आता काँग्रेसची ताकद वाढली आहे. मी नरेंद्र मोदींना मारूही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असंही नाना म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी नाना पटोले यांनी हे वक्तव्य केल्याचं सांगितलं जातंय.

असं असलं तरी प्रदेशाध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीने असं वक्तव्य केल्यानं आता नाना पटोले यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे प्रचार सभा घेतली होती. त्यावेळी काही नागरिकांनी समस्या देखील नाना पटोले यांच्याकडे मांडली.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?” 

‘…तर पुण्यात बसने प्रवास करता येणार नाही’; महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय