राज्यात कोरोनामुक्त पोलिसांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 35 पोलिसांना डिस्चार्ज

मुंबई | आज एका दिवसात 35 पोलीस कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकीकडे कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत असताना आता कोरोनामुक्त पोलिसांचाही आकडा वाढत आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या 28 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार 479 पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षण आढळली आहेत.

आतापर्यंत 188 पोलीस अधिकारी आणि 1291 पोलीस कर्मचाऱ्यांत कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाबाधितांमध्ये मुंबई पोलीस दलातील पोलिसांची संख्या जास्त आहे.

मुंबई पोलीस दलातील जवान मोठ्या संख्येने कोरोनाबाधित होत आहे. हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी स्वत: कंबर कसली आहे. त्या अनुषगांने आता प्रत्येक पोलीस स्टेशन सॅनिटाईज करण्याचे काम सुरु आहे. मुंबई पोलीस स्वत: हे काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-संकटाच्या छाताडावर पाय ठेवून ते परतवून लावू- उद्धव ठाकरे

-चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस घराबाहेर पडू नका- उद्धव ठाकरे

-रायगडमधील ‘या’ समुद्र किनाऱ्यावर चक्री वादळाची शक्यता

-मनोज तिवारी यांना धक्का; भाजपच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी

-“नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा”