कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू; एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यात आज एका दिवसात तब्बल 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोन पोलिसांचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र त्यांनादेखील आता कोरोनाची लागण होत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर  1 हजार 140 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या तीन दिवसांत 196 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आज एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काल एका दिवसात 60 पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1 हजार 140 वर पोहोचला आहे.

कोरोनाची लक्षण असणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 88 अधिकारी आणि 774 पोलीस कर्मचारी अशा एकूण 864 पोलिसांत लक्षण दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आत्मनिर्भर कृषीविषयक पॅकेजच्या घोषणांवर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

-…म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी!

-कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे- एकनाथ शिंदे

-“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”

-शेतकऱ्यांना आधार द्या; आंतरराष्ट्रीय रेटिंग आपोआप सुधारेल – राहुल गांधी